housa

आरती संग्रह

Home आरती संग्रह व उत्सव काळातील नित्य गोष्टीविषयी माहिती

housa

श्री विष्णू

आवडी गंगाजळे देवा न्हाणिले l
भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पीले l
अहं का धूप जाळू श्रीहरिपुढे l
जंव जंव धूप जळे l तंव तंव देवा आवडे ll१ll
आरती आरती करू गोपाला l मी तू पण सांडोनी वेळोवेळा llध्रुll
रमावल्लभदासे अहं धूप जाळीला l
एका आरतीचा मग प्रारंभ केला l
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा l
समाधी लागली पाहता मुखारविंदा ll२ll आरती...
हरीखे हरीख होतो मूख पाहता l
प्रकटल्या ह्या नारी सर्वही अवस्था l
सद्भावालागी बहु हा देव भूकेला l
रमावल्लभदासे अहं नैवेद्य अर्पिला ll३ll आरती...
फल तांबूल दक्षिणा अर्पिली l
तया उपरी निरांजने मांडली l
पंचप्राण पंचज्योती आरती उजळली l
विश्व हे लोपले तया प्रकाशातळी ll४ll आरती...
आरती प्रकाशे चंद्रसूर्य लोपले l
सुरवर नभी तेथे तटस्थ ठेले l
देवभक्तपण अवघे न दिसे काही l
ऐशापरी दास रमावल्लभा पायी ll५ll आरती...